Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईच्‍या विकासासाठी सर्वांनी मिळून चांगले काम करुया - आदित्‍य ठाकरे


मुंबई - आपण कुठल्‍याही पक्षाचे असलो तरी आपण जनतेसाठी काम करित असल्‍याने आपली बांधिलकी ही जनतेशी असून सर्वांनी मिळून चांगले काम करुन मुंबईचा विकास घडवूया असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘ टोपीवाला म.न.पा. मंडई पुनर्विकास व प्रभाकर पणशीकर नाटयगृह’ चे भूमिपूजन शिवसेना नेते व युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते व मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली संपन्न झाले, याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बाल विकास राज्‍यमंत्री विद्या ठाकुर, उप महापौर हेमांगी वरळीकर, आमदार सुनिल प्रभु, दाजी पणशीकर, स्‍थापत्‍य समिती (उपनगरे) अध्‍यक्षा साधना माने, पी/ दक्षिण प्रभाग समिती अध्‍यक्ष संदिप पटेल, बाजार व उद्यान समिती अध्‍यक्ष हाजी मोहम्‍मद हलीम खान, स्‍थानिक नगरसेवक हर्ष पटेल, नगरसेवक राजू पाध्‍ये, बाळा नर, स्‍वप्‍निल टेंबवलकर, दिपक ठाकुर, सुहास वाडकर, नगरसेविका लोचना चव्‍हाण, रेखा रामवंशी, प्रिती सातम, राजुल देसाई, श्रीकला पिल्‍लई, माजी उप महापौर दिलीप पटेल, माजी आमदार विनोद घोसाळकर, उप आयुक्‍त (परिमंडळ - ४) किरण आचरेकर, पी/दक्षिण विभागाच्‍या सहाय्यक आयुक्‍त चंदा जाधव, सहाय्यक आयुक्‍त (बाजार) डॉ. संगिता हसनाळे हे मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्‍य ठाकरे बोलताना पुढे म्‍हणाले की, जगभरातील कुठलीही महानगरपालिका इतक्‍या सेवा –सुविधा देत नसेल तितक्‍या सेवा- सुविधा बृहन्‍मुंबई महानगरपालिका नागरिकांना देत आहे. आपण सर्व तरुण नगरसेवक आहात आपण या सर्व सेवा – सुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे. याठिकाणी मंडई व नाटयगृहाची सुंदर इमारत शशी प्रभु यांच्‍या संकल्‍पनेतून उभी राहणार असल्‍याने त्‍याचा आनंद होत आहे. दिवसभर आपण मुंबईकरांसाठी चांगले काम करित असल्‍याने रात्री सर्वांना झोपताना एक समाधान मिळत असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना देत असलेल्‍या सेवांचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. सर्वांच्‍या पाठपुराव्‍याने आज हे शक्‍य झाले असून तीन वर्षात या इमारतीचे बांधकाम पूर्ण करावे तसेच या कामाचा दर्जा हा चांगला असावा असेही महापौरांनी सांगितले. त्‍यासोबतच या परिसरातील नागरिकांसाठी एक चांगल्‍या नाटयगृहाची सोय उपलब्‍ध होत असल्‍याने सर्वांचे अभिनंदन केले . तसेच मंडईतील सुविधांबाबत आणखी एक बैठक घेणार असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, या परिसरातील नागरिकांची बऱयाच दिवसाची मागणी पूर्ण होत असल्‍याने आनंद होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. भूमिपूजनासाठी आदित्‍य ठाकरे उपस्थित राहिल्‍याबद्दल त्‍यांनी त्‍यांचे आभार मानले. राज्‍य शासनाने चार चटई क्षेत्र मंजूर केल्‍यामुळे याठिकाणी सदनिका बांधणे शक्‍य होणार असून महापालिका डॉक्‍टरांसाठी या सदनिका उपलब्‍ध करुन द्याव्‍यात जेणेकरुन डॉक्‍टरांच्‍या निवासाचा प्रश्‍न मार्गी लागेल अशी सूचना उद्योगमंत्र्यांनी यावेळी केली. त्‍याचप्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या आदेशानुसारच प्रभाकर पणशीकर यांचे नाव नाटयगृहाला देणार असल्‍याचे मंत्रीमहोदयांनी यावेळी सांगितले. शिवसेना प्रमुखांचा आदेश आज पूर्ण होत असल्‍याचा आनंद होत असल्‍याचे त्‍यांनी शेवटी सांगितले.

महिला व बाल विकास राज्‍यमंत्री विद्या ठाकुर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, गोरेगावकरांना एक हक्‍काचे नाटयगृह आता मिळणार असल्‍याने आनंद होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे मंडईतील गाळेधारकांचे पुर्नवसन करताना त्‍यांना सौजन्‍याची वागणूक देणे तसेच ७ बाय ७ बायची जागा उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी त्‍यांनी यावेळी केली. आदित्‍य ठाकरे या‍ कार्यक्रमाला उपस्थित राहिल्‍याबद्दल त्‍यांनी त्‍यांचे आभार मानले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom