भगवत गीते ऐवजी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे ज्ञान द्या - भीम आर्मी

JPN NEWS

मुंबई - शाळा महाविद्यालयांमध्ये भगवत गीता वाटण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने प्रखर विरोध केला आहे. भारतातील युवा व विद्यार्थ्यांना धार्मिक ज्ञानाची गरज असून देश अखंड ठेवणाऱ्या भारतीय संविधानाच्या ज्ञानजी गरज असल्याने भगवत गीतेएवजी भरती संविधानाचा शालेय अभ्रासक्रमात समावेश करून संविधानाचे त्यांना वाटप करण्यात यावे अशी मागणी या संघटनेचे प्रदेश प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व कुलगुरूंना पाठविलेल्या निवेदनात दिला आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागामार्फ़त मुंबईसह राज्यातील शाळा आणि महाविद्यालयामध्ये भगवत गीतेंच्या प्रति वितरित करण्याचे आदेश दिले आहेत या विषयावरून राज्यभरटीवी प्रतिक्रिया उमटत असून गीतेएवजी भरती संविधानाच्या ज्ञानाजी नव्या पिढीला गरज असल्याचे भीम आर्मीने म्हटले आहे . भारत देश हा सर्वधर्म संभव मानणारा धर्मनिरपेक्ष देश आहे. भारताला जगासोबत स्पर्धा करावयाची असल्यास कोणा एका विशिष्ट धर्माच्या ज्ञानाची युवा पिढीला गरज नाही. आपल्या देशात अनेक जाती धर्म आणि त्यांचे विविध धर्मग्रंथ असले तरी आपला देश एकच असून या देशाचा राष्ट्रग्रंथ हा भारतीय संविधानच आहे. त्यामुळे सध्याच्या तरुण पिडीला एका धर्माच्या ज्ञानाऐवजी देशाच्या ज्ञान गरज आहे असे कांबळे यांनी म्हटले आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण खात्याच्या कारभारावर राज्यात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे अनेक महाविद्यालयांचे अनुदान व शिष्यवृत्ती राज्य शासनाकडे थकीत आहे त्यावर निर्णय घेण्याऐवजी राज्य सरकारने भगवंत गीता वाटपाचा हा तुघलकी निर्णय घेतला आहे, असा आरोप कांबळे यांनी केला आहे . आपण हा निर्णय त्वरित मागे घ्यावा. भगवत गीते ऐवजी देशाचा आदर्श नागरिक घडविण्यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयात धर्मनिरपेक्ष आणि सर्वांना एका धाग्यात बांधून ठेवणा-या भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमात समावेश करावा. तसेच संविधानाच्या प्रति वाटप करण्यात अशी मागणी कांबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.