खड्डे बुजवले म्हणून नगरसेवकाला पोलिसांनी डांबून ठेवले

JPN NEWS

मुंबई - मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. हे खड्डे वेळेवर बुजवले जात नसल्याने वाहनच चालकांचा अपघात होऊन मृत्यू होतो. असे अपघात टाळता यावेत म्हणून खड्डे बजावणाऱ्या नगरसेवकाला पोलीस ठाण्यात डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १७९ चे काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी प्रतीक्षा नगर येथील एस. एम.  रोडवर खड्डे भरो आंदोलन केले. यासाठी परवानगी घेतली नाही असे कारण देऊन वडाळा पोलिसांनी त्यांना व मुकुंदराव मेहता, अब्दुल रसद, इब्राहिम यांच्यासह ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना पोलीस ठाण्यात तासभर डांबून ठेवले. सुफियान वनू यांनी पालिका सभागृहात खड्ड्यांच्या समस्येवर पालिका प्रशासन व पोलीस यांच्याकडून अन्याय करण्यात येत असल्याची तक्रार महापौरांकडे केली.

माझे काँग्रेसमधील सहकारी मुकुंदराव मेहता, अब्दुल रसद, इब्राहिम यांच्यासह मला खड्डे बुजविण्यासाठी परवानगी घेतली नसल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी ताब्यात घेऊन एक तास पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. रस्त्यावर पडणारे खड्डे पालिका बुजवत नाही. त्याचे खापर नागरिक नगरसेवकांवर फोडतात व आम्ही स्वतः जर खड्डे बुजवले तर आम्हाला पोलीस ठाण्यात डांबून आमची मुस्कटदाबी करतात असे सुफियान वणू यांनी सांगितले. 
Tags