मुंबईतील आठ पुलांची पाहणी

JPN NEWS

मुंबई - अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे, पालिका, आयआयटीच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक मुंबईतील ४५५ पुलांची पाहणी करेल, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यानुसार पथकांनी टप्प्याटप्प्यात पाहणीचे काम सुरू केले आहे. त्यानुसार रविवारी, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह आयआयटीच्या तज्ज्ञांनी आठ पुलांची पाहणी केली. त्यात करी रोड, चिंचपोकळी (आर्थर पूल), टाटा पॉवर केबल पूल, एस पूल, भायखळा उड्डाणपूल, ऑलिवंट उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, चुनाभट्टी उड्डाणपुलांचा समावेश आहे. आठपैकी सहा पुलांची पाहणी रेल्वे मार्गावरून टॉवर वॅगनच्या सहाय्याने करण्यात आली. अन्य दोन्ही पुलांची पाहणी रेल्वे मार्गाबाहेरून करण्यात आली. या पुलांच्या पाहणीचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे.
Tags