स्मशानभूमींमध्ये स्वच्छता 'आऊटसोर्सिंग'द्वारे

JPN NEWS
मुंबई - शहरातील स्मशानभूमीत अपुरे मनुष्यबळ आहे. यामुळे स्मशानभूमीतील स्वच्छतेवर परिणाम होतो, अशी कबुली महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य खात्याने दिली आहे. यामुळे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ सेवेचे 'आऊटसोर्सिंग' करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. प्रति विभाग, प्रति महिना या तत्त्वावर शहर विभागातील ८, पश्चिम उपनगरांतील एकूण २३ आणि पूर्व उपनगरांतील १५ स्मशानभूमींची स्वच्छता आऊटसोर्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. शहर विभागात ८ लाख ८६ हजार ९७७ चौरस फूट, पश्चिम उपनगरांत १४ लाख ६७ हजार ५१९ चौरस फूट आणि पूर्व उपनगरांतील १५ स्मशानभूमीमध्ये १५ लाख ७९ हजार ८२४ चौरस फूट क्षेत्रफळांच्या स्मशानभूमीची नियमित स्वच्छता व सफाई या कामांसाठी १३ कोटी ७० हजार ७१० रुपये खर्च करणार आहे. या कामांचे कंत्राट एएचएफएम हॉस्पिटॅलिटी अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट या कंत्राटदाराला देण्यात येणार असून, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
Tags