भारतात २३ दशलक्ष मुले बालकामगार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

12 July 2018

भारतात २३ दशलक्ष मुले बालकामगार


नवी दिल्ली - भारतातील १५ ते १८ वयोगटातील सुमारे २३ दशलक्ष मुले बालकामगार आहेत. यापैकी १९ दशलक्ष मुलांनी शिक्षणही सोडून दिले आहे. 'क्राय' या सामाजिक संस्थेने भारतातील १५ ते १८ वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१५-१६च्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि २०१६चा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवातील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

देशातील २३ दशलक्ष बालकामगारांपैकी १९ दशलक्ष जणांवर केवळ शिक्षण आणि नोकरी या दोन्हीचा ताळमेळ साधता न आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडण्याचे प्रमाण पाहता शिक्षणाच्या धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्याची गरज असून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांना माध्यमिक शिक्षणही मोफत देण्याची गरज या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. १५ ते १९ वयोगटातील ९.२ दशलक्ष मुलांचे विवाह झाले आहेत. तर याच वयोगटातील २.५ दशलक्ष मुली माता झाल्या आहेत. लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले असून अपहरण झालेल्या मुलींमधील ६० टक्के मुली १५ ते १८ वयोगटातील आहेत. तर २५ टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या वयोगटातील आहेत.

Post Top Ad

test