माहुलमधील इमारतींच्या परिरक्षणासाठी ४ संस्थांची नेमणूक - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 July 2018

माहुलमधील इमारतींच्या परिरक्षणासाठी ४ संस्थांची नेमणूक


मुंबई 6/7/2018 - वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेल्या माहूलमधील इमारतींच्या परीरक्षणासाठी ४ संस्थांची नेमणूक महापालिकेने केली आहे. सदनिकांमधील नळपाईप, दरवाजे-खिडक्या, विद्युत पुरवठा-वायरिंग किंवा फरश्यांची दुरुस्‍ती आदी कामे या संस्था करणार आहेत.

झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाद्वारे व विकासकामार्फत महापालिकेच्या विविध प्रकल्पांतर्गत बाधित झालेल्यासाठी माहूल परिसरात इमारतींचे संकुल उभारण्यात आले. वर्ष २०१० ते २०१२ या दरम्यान उभारण्यात आलेल्या या इमारती वर्ष २०१४ पासून टप्प्याटप्प्याने विकासकांकडून महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्या. याठिकाणी प्रकल्पबाधितांनी वर्ष २०१६ पासून वास्तव्यास येण्यास सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत १० हजार ९३४ सदनिकांचे वाटप प्रकल्पग्रस्तांसाठी करण्यात आले. तथापि, प्रत्यक्षात ५ हजार ९९ सदनिकांमध्ये प्रकल्पबाधीत कुटुंबे राहण्यास आली आहेत. या सदनिका ब-याच कालावधीसाठी रिक्त राहिल्यामुळे त्यात किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असू शकते, तसचे इमारतींमधील सामाईक परिसरांमध्ये देखील दुरुस्तीची व परिरक्षणाची करणार आहे. येथील सदनिकांमधील नळ-पाईप, दरवाजे-खिडक्या, विद्युत पुरवठा-वायरिंग किंवा फरश्यांची दुरुस्‍ती आवश्‍यकतेनुसार करण्‍याकरिता ४ बाह्य सेवा पुरवठादार संस्‍थाची नियुक्‍ती केली असून या संस्‍थांकडे प्रत्‍येकी दहा ते बारा इमारतींचे परिरक्षण सोपविण्यात आले आहे. रिक्‍त सदनिकांचा ताबा देतेवेळी आवश्‍यकतेनुसार विद्युत विषयक कामे, स्थापत्य कामे, नळाची कामे किंवा सुतारकामे इत्यादीं कामे करुन घेणे, यामुळे सुलभ होणार आहे. सदर कामे हे 'सहाय्यक आयुक्‍त (एम /पच्छिम) विभागाच्‍या पर्यवेक्षणखाली करण्‍यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता खात्याचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांनी दिली.

सदनिकांच्या परिरक्षणासोबतच इमारतींमधील सामाईक सोयी सुविधांच्या परिरक्षण, दुरुस्‍तीची जबाबदारी देखील याच ४ संस्थांकडे सोपवली आहे. यामुळे इमारतींमधील जलवाहिन्या -मलवाहिन्यांची दुरुस्ती कामे संरचनात्मक दुरुस्ती कामे, सार्वजनिक'पॅसेज'मधील विद्युत दुरुस्ती व्हरांडा, जिने, जिन्यातील ट्यूब-लाईट इत्यादी कामे अधिक सुलभतेने करवून घेणे शक्य होणार आहे. या सेवा पुरवठादार संस्‍थांची नियुक्ती ही २ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून त्यासाठी रुपये २८ कोटी ८५ लाख एवढ्या निधीची तरतूद केली आहे. तसेच सोयी- सुविधाबाबत करावयाच्‍या दुरुस्‍तीबाबतचे तक्रारी, निवेदन देण्‍याकरिता, तसेच त्‍यांचे निरसन करण्‍याकरिता संकुलामध्‍ये सहा. अभियंता (परिरक्षण) यांची चौकी उभारण्‍यात आल्याचे मसुरकर यांनी सांगितले.

Post Top Ad

test