नालासोपारा स्फोटक प्रकरण - अविनाश पवारला घाटकोपरमधून अटक - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 August 2018

नालासोपारा स्फोटक प्रकरण - अविनाश पवारला घाटकोपरमधून अटक


मुंबई - नालासोपारा येथील स्फोटकेप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने आणखी एकाला घाटकोपरमधून अटक केली आहे. अविनाश पवार (३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा भंडारआळी या ठिकाणी राहत असलेल्या वैभव राऊत (४०) याच्या घरातून व दुकानातून गावठी बॉम्बसह स्फोटके जप्त करून संभाव्य घातपाताचा कट उधळून लावला होता. या कारवाईनंतर एटीएसने पुणे, औरंगाबाद, सोलापूर, सातारा, सांगली आणि जालनासह राज्यभरात विविध ठिकाणी धाडसत्र सुरू ठेवले. आतापर्यंत वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना एटीएसने अटक केली आहे. या सर्वांकडे कसून चौकशी सुरू असतानाच अविनाश पवारचे नाव समोर आले होते. त्यानुसार, एटीएसने अविनाशवर करडी नजर ठेवत अखेर त्याला शनिवारी रात्री उशिरा अटक केली. अटकेत असलेल्या तिघांकडून मिळालेल्या माहितीवरून आणि त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १३ ते १४ जणांना मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रे आणि स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेल्या वैभव राऊत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इंटरनेटवरून बॉम्ब बनवण्याचे धडे घेतल्याचेही चौकशीतून समोर आले आहे. अविनाश पवारला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या अथवा पानसरे यांच्या हत्येत अविनाशचा काही संबंध आहे का? याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासासाठी पवार याचा ताबा सीबीआयदेखील घेण्याची शक्यता आहे.

Post Top Ad

test