Type Here to Get Search Results !

माहुल प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू - आठवले

मुंबई - चेंबूर माहुल येथील प्रकल्पग्रस्तांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या सुरक्षित पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन आठवले यांनी दिले. 

मुंबईच्या विविध विभागांमधील प्रकल्पग्रस्तांचे माहुल येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांचे प्रदूषित वातावरणामुळे जीवन धोक्यात आले आहे. माहुल येथील भारत पेट्रोलियम प्रकल्पात नुकताच मोठा स्फोट होऊन आग लागली. याकारणाने प्रकल्पग्रस्तांध्ये भीतीचे वातावरण आहे. या भयग्रस्त रहिवाशांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठवले यांना दिले. आठवले यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यां ऐकून त्यांचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन दिले. यावेळी आठवले यांनी भारत पेट्रोलियम प्रकल्पात झालेल्या स्फोटाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. 
यांच्या सोबत महाराष्ट्र उपाध्यक्ष दिपक निकाळजे, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
Tags

Top Post Ad

Below Post Ad