Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

चेंबूर भारत पेट्रोलियमच्या आगीत ४३ जण जखमी


मुंबई - चेंबूर-माहुल येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरीमधील हायड्रो-क्रॅकर बॉयलरचा दुपारी पावणेतीन वाजता स्फोट झाला. या स्फोटात भारत पेट्रोलियमचे ४३ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील २२ कर्मचाऱ्यांवर भारत पेट्रोलियमच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले तर २१ कर्मचाऱ्यांना चेंबूरमधील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एका कर्मचाऱ्याची प्रकृती गंभीर आहे. घटनास्थळी बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, मुंबई पालिका आणि माझगाव डॉक अग्निशमन दलाने धाव घेतली असली तरी भारत पेट्रोलियमच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न रात्रीपर्यंत सुरु होते.

जखमींची नावे - 
आयसीसीयू - भूषण पंडित ४७ वर्षे, सरबजीत मंडल २३ वर्षे, सुशील भोसले ३५ वर्षे, कृष्णमूर्ती ५७ वर्षे, भूषण पंडित ४७ वर्षे, सरबजीत मंडल २३ वर्षे, सुशील भोसले ३५ वर्षे, कृष्णमूर्ती ५७ वर्षे, नंदीप वाळवे ५३ वर्षे

डिजास्टर वॉर्ड - अवधूत परब ४४ वर्षे, शेख मोहम्मद सौत ४० वर्षे, नितीन म्हात्रे ५३ वर्षे, परमानंद टावरे ६० वर्षे, अस्लम शेख २९ वर्षे, विनय शेडगे २१ वर्षे, सुशील शिवणकर २३ वर्षे, राहुल झुंझारराव ४१ वर्षे, सचिन सदाफुले ३२ वर्षे, शमीम खान २३ वर्षे, रमेशकुमार २० वर्षे

वॉर्ड - फिलिप कुरियन ५३ वर्षे, संजय साखरे ३७ वर्षे

फिमेल वॉर्ड - अजय सुर्वे ४७ वर्षे, जयप्रकाश कदम ५८ वर्षे

अपघात विभाग - प्रसाद साटम ५४ वर्षे, विनोद पंडित ४४ वर्षे

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom