कत्तलखान्यातून बकरे चोरणाऱ्यांना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कत्तलखान्यातून बकरे चोरणाऱ्यांना अटक

Share This
मुंबई - देवनार कत्तलखान्यातील खरेदी-विक्रीदारांच्या गर्दीचा फायदा घेत येथील बकरे चोरणाऱ्या तिघा आरोपींना देवनार पोलिसांनी अटक केली. रात्रीच्या वेळेस बकऱ्यांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांना चोरून पुन्हा त्यांची ईदपूर्वी चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. फैजल ऊर्फ नजीर कुरेशी (२८), कुदरत ऊर्फ पाया शेख (१८), रिहान शेख (२९) अशी या बकरे चोरांची नावे आहेत. बकरी ईदमुळे देवनार येथील कत्तलखान्यात मुंबई व उपनगरांतील मुस्लिमबांधव परराज्यातून येणारी बकरे खरेदी करण्यासाठी देवनारच्या कत्तलखान्यात गर्दी करत असतात. त्याचबरोबर बकऱ्यांची विक्री करण्यासाठी आलेले व्यापारीदेखील आपली बकरे विकण्यासाठी देवनारच्या बकऱ्यांच्या बाजाराला पसंती देत असल्याने या ठिकाणी बरीच गर्दी होते. याचा फायदा भुरट्या चोरांबरोबरच बकरे चोरणारे देखील घेत असल्याचे येथील चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी बकऱ्यांच्या आवाजामुळे या बकरे चोरणाऱ्या तिघांचा पर्दाफाश झाला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages