Type Here to Get Search Results !

मुंबई पालिकेतील सहा नगरसेवकांचे पद धोक्यात

मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवून नगरसेवक झालेल्याना सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे सादर कराचे असते. असे न करणाऱ्या नगरसेवकांचे पद आपोआप रद्द होते. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयानुसार मुंबई पालिकेमधील सहा नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. मुंबई पालिकेतील अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी व शिवसेनेचे सगुण नाईक यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी न्यायालयात आव्हान दिल्याने या दोघांचे नगरसेवकपद रद्द झाले आहे. तर काँग्रेसच्या टय़ुलिप मिरांडा, काँग्रेसचे राजपती यादव, भाजपाच्या सुधा सिंग, भाजपचे मुरजी पटेल, भाजपच्या केशरीबेन पटेल तसेच भाजपचे पंकज यादव यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र पडताळणी समिती फेटाळले आहे. याला या नगरसेवकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. 
Tags

Top Post Ad

Below Post Ad