२३ ते २५ ऑगस्ट बुद्धीस्ट महोत्सवाचे आयोजन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

06 August 2018

२३ ते २५ ऑगस्ट बुद्धीस्ट महोत्सवाचे आयोजन


मुंबई - पर्यटन मंत्रालयातर्फे जवळील अजिंठा-वेरुठ येथे २३ ते २५ ऑगस्ट दरम्यान सहाव्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात म्यानमार, कोलंबिया, थायलंड, व्हीएतनाम सारख्या २१ देशातील सुमारे २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच बोधगया, राजगीर, नालंदा आणि सारनाथ सारख्या पर्यटनस्थळांना भेटी देऊन, तिथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही हे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. राज्य सरकारने २०१८-२०१९ या वर्षात राज्यातील पर्यटनस्थळांना चालना मिळावी म्हणून ७८ कोटी रूपयांचा निधी राखीव ठेवला होता. याच निधीतून मोहोत्सवात उपस्थित राहणाऱया प्रतिनिधींच्या व्यवस्थेसाठी २ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। 

Post Top Ad

test