Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

क्रिस्टल टॉवरला आग, चार जणांचा मृत्यू


मुंबई - हिंदमाताजवळच्या १६ मजली क्रिस्टल टॉवरला सकाळी आठच्या सुमारास आग लागली. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून २१ जण गुदमरल्याने त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाने इमारतीमधील ४० जणांची अथक प्रयत्नानंतर सुटका केली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा कार्यरत नव्हती तसेच भोगवटा प्रमाणपत्र नसल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. 

आगी प्रकरणी भोईवाडा पोलिसांत विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल रझाक इस्माईल सुपारीवाला असे गुन्हा दाखल केलेल्या विकासकाचे नाव आहे. या प्रकरणाचा अग्निशमन दलाने सखोल तपास केला असता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना असे निदर्शनास आले की, क्रिस्टल टॉवरच्या विकासकाने कायमस्वरूपी आग विझवण्याची यंत्रणा चालू ठेवणे व इलेक्ट्रीक सील करणे आवश्यक आहे, यांची जाणीव असताना देखील ही यंत्रणा बंद ठेवली. त्यामुळे या टॉवरला आग लागून त्यात जीवितहानी झाली. या प्रकरणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून विकासक सुपारीवाला याच्याविरोधात टॉवरमधील रहिवाशांच्या जीवितास व व्यक्तिगत सुरक्षेस धोका निर्माण केल्याप्रकरणी भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या वेळी अवघ्या १० वर्षांच्या झेन सदावर्ते या मुलीने शालेय अभ्यासक्रमातील धड्याचा प्रत्यक्षात अंमल करून १५ जणांचा जीव वाचवला. याच इमारतीत १० वर्षीय झेन सदावर्ते राहते. आग लागल्याचे तिच्या लक्षात येताच शालेय अभ्यासक्रमात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्याचे प्रशिक्षण कामी आले. आग आणि धुरामुळे १५ जण अडकून पडले. या वेळी धुरापासून वाचण्यासाठी रुमाल ओला करून नाकातोंडाला बांधण्यास झेनने रहिवाशांना सांगितले. त्यामुळे १० व्या मजल्यावरून त्यांची सुखरूप सुटका होण्यात यश आले.

मृतांची नावे -
शुभदा शिर्के (६२), बाबूल शेख (३६), अशोक संपत व संजीव नायर .

जखमींची नावे - 
वीणा संपत (७४), डॉली मैथी (४५), राजू नरवडे (२२), गुलाम शेख शफी (२६), जयवंत सावंत (५७), ज्योत्स्ना बेरा (६४), कार्तिक सुवर्णा (१४), अक्षता सुवर्णा (१८), शेख माशुक अली (४७), महेश सुवर्णा (४७), चंद्रिका सुवर्णा (४०), संदीप मांजरे (२७), अशफाक खान (४८), अझरुद्दीन शेख (३१), नवीनचंद्र संपत (७७), हर्ष तुपारे (३९), सुनील देसाई (३२), दिनेश मेहतर (२२), अब्दुल रहमान शेख (२६), मोहमद अहमद रफिक शेख (३६), प्रमोद राजेंद्र गिरसे (२६).

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom