संपाचा परिणाम नाही - मंत्रालयात ७७ टक्के उपस्थिती

JPN NEWS
मुंबई -  राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी मंत्रालयात 77 टक्के अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. तर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे 58 टक्के अधिकारी व कर्मचारी कामावर उपस्थित होते. मंत्रालयात अ आणि ब गटाची 85.50 टक्के, क गटाची 79.54, ड गटाची 65.28 टक्के अशी एकूण 77.34 टक्के उपस्थिती होती. तर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सुमारे 58 टक्के अधिकारी व कर्मचारी कामावर उपस्थित होते.