मेट्रोच्या कामावर प्रवीण दराडेंची करडी नजर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रोच्या कामावर प्रवीण दराडेंची करडी नजर

Share This

मुंबई - दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो ७ मार्गिकेचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून अत्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गिकेचे काम अत्यंत नियोजनात्मक पद्धतीने सुरू असून, या कामावर लक्ष देता यावे, यासाठी मार्गिकेदरम्यान सीसीटीव्ही बसविण्यात आले असून, एमएमआरडीए कार्यालयात मोठ्या स्क्रिन्सच्या माध्यमातून खुद्द आयुक्त प्रवीण दराडे या कामांकडे लक्ष देणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गिकेचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या मार्गिकेदरम्यान काही महिन्यांपूर्वी गर्डरचे लोखंडी छत कोसळले होते, तर काही दिवसांपूर्वीच अरूंद रस्त्यांवरील मेट्रो खांबांचे स्थलांतर करतानाही बेस्ट बसच्या छतावर कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे मेट्रो मार्गिकेदरम्यानच्या कामांवर प्रत्यक्ष जाणे दरवेळेस शक्य होतेच असे नाही. हे हेरूनच मार्गिकेदरम्यान सीसीटीव्ही फुटेज लावण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी घेतला होता. त्यानुसारच सीसीटीव्हीचे स्क्रिनिंग थेट दराडे यांच्या केबिनमध्येच करण्यात आले असून, केबिनचे रूपांतर मिनी कंट्रोल रूममध्ये करण्यात आले आहे. दर आठवड्याला कंत्राटदरांबरोबरच बैठक तसेच मार्गिकेदरम्यानचे अपडेट्स घेण्यात येणार आहेत. कंत्राटदार एल ॲण्ड टी यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवण्याचे काम करण्यात आले असून, यामुळे मार्गिकेदरम्यानचे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. तसेच मेट्रोच्या कामाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.  

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages