११ मुलींचे लैगिंक शोषण, आरोपीला अटक


मुंबई - महाविद्यालीयन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या नराधमास ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गौरव मोरे असे आरोपी विद्याथ्र्याचे नाव आहे. ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केल्यानंतर त्याने ११ मुलींचे लैगिंक शोषण केल्याची कबुली त्याने दिली आहे.

मुंबईच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिकत असलेला आरोपी गौरव मोरेने अकरावीत शिकणाऱ्या एका तरुणीलाही आपल्या जाळ्यात ओढले होते. तिच्यावर अत्याचार करून ब्लॅकमेल करत त्याने ५० हजार रुपयांची मागणी केली होती. मोेरेच्या त्रासामुळे त्रस्त झाल्यामुळे ठाण्यातील त्या विद्यार्थिनीने अखेर ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. आरोपी गौरव मोरेला अटक करून त्याच्याविरोधात खंडणी, अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला आहे. माझ्यावर प्रेम केले नाही, तर मी विष पिऊन आत्महत्या करीन, असे भावनिक मेसेज पाठवून आरोपी विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. त्यानंतर विद्यार्थिनींशी शरीरसंबंध ठेवून नग्न फोटो काढून ब्लॅकमेल करत असे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Tags