Type Here to Get Search Results !

तरुणीचा विनयभंग - राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक


मुंबई - राजकीय पक्षाचा पदाधिकारी असलेल्या इसमाला तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अटक केली. उमेश पांडे (३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय बळीत मुलीचे वडील पांडे याचे मित्र आहेत व ते कुटुंबीयांसह पांडे याच्या कार्यालयाशेजारीच राहतात. पांडेकडे जेव्हा लोक भेटण्यासाठी येत असत तेव्हा तो बळिताच्या घरातूनच पाणी व चहा मागवत असे. बळित मुलगी आरोपी पांडे याला अंकल म्हणून बोलवत असे. गेल्या काही दिवसांपासून बळिताचे वडील बाहेरगावी गेल्यानंतर पांडे बळिताला ऑफिसमध्ये चहा पाण्याच्या निमित्ताने बोलावून घेत असे. अशातच तिने पांडेला नोकरीबाबत विचारले. शनिवारी त्याने नोकरीसंबंधी बोलण्याचे सांगत बळिताला ऑफिसमध्ये बोलावून तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या वेळी संतापलेल्या तरुणीने आरडाओरडा केला. शेजाऱ्यांनी पांडेच्या कार्यालयात धाव घेत त्याला घेरले व पोलिसांना पाचारण केले. मालवणी पोलिसांनी पांडेला अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad