Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राम कदमांवर मनसेचा बॅनरहल्ला - 'पप्पू पुन्हा नापास झाला'


मुंबई - लोकप्रतिनिधींच्या कामगिरीचा अभ्यास करून त्यांना मानांकन देणाऱ्या 'प्रजा फाऊंडेशन'ने आपला अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यात भाजपाचे प्रवक्ते राम कदम यांचा ३२ वा क्रमांक म्हणजेच शेवटचा क्रमांक लावला असल्याने कदम चांगलेच अडचणीत आले आहेत. प्रजाच्या अहवालात शेवटचा क्रमांक देण्यात आलेल्या कदम यांची खिल्ली उडवणारे बॅनर मनसेने घाटकोपरमध्ये लावले आहेत. 'पप्पू पुन्हा नापास झाला' अशा मथळ्याचे हे बॅनर संपूर्ण घाटकोपरमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी घाटकोपरच्या विविध भागातच नाही तर आमदार राम कदम राहत असलेल्या ऑर्चिड इमारतीसमोर देखील त्यांची खिल्ली उडवत अभिनंदन करणारे फ्लेक्स लावल्याने गुरुवारी घाटकोपरमधील राजकीय वातावरण तापले होते. गेली तीन वर्षे प्रजा फाऊंडेशनच्या या रिपोर्ट कार्डमध्ये आमदार राम कदम यांना शेवटचा क्रमांक मिळत आहे. यावर मनसेने घाटकोपरच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर सर्वोदय रुग्णालयासमोर, अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आर सिटी मॉलच्या बाजूला असलेल्या आमदार राम कदम राहात असलेल्या ऑर्चिड इमारतीसमोर देखील त्यांची खिल्ली उडवत हे फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्सचे फोटो काढून मनसैनिकांनी मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर व्हायरल देखील केले. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी हे फ्लेक्स दुपारीच काढून टाकले. राम कदम हे नेहमीच जगातील मोठ्या गोष्टी करत असल्याचे सांगत असतात, परंतु त्यांच्या मतदारसंघात महिलांना उघड्यावर शौचालयास जावे लागते, घाटकोपरमध्ये पिण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, लाल बहादूर शास्त्री मार्गाचे रुंदीकरण असे अनेक प्रश्न विभागात असताना फक्त भंपक इव्हेन्ट करत असतात आणि या मुख्य विकासाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतात आणि याचमुळे त्यांना प्रजा फाऊंडेशनने शेवटचा क्रमांक दिला असून हा खरा सर्व्हे दाखविल्याबद्दल मनसेतर्फे आम्ही त्यांचे आभार मानतो आणि कदम यांचे लक्ष विकासकामांकडे वेधण्यासाठी आम्ही हे फ्लेक्स लावले असल्याचे गणेश चुक्कल यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom