
डोंबीवली - वयोमानानुसार जडणारे आजार, उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारीने प्रत्येक जण ग्रासलेले आहे. त्यात जेष्ठ नागरिकांना केवळ औषधोपचार नाही तर मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे हे लक्षात घेता आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एसआरव्ही ममता हॉस्पिटल, डोंबिवली यांच्या मार्फत वृध्दांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखरेची तपासणी, ईसीजी आणि डॉक्टरांकडून वृध्दांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ज्येष्ठांना होणाऱ्या आजारांवरही डॉ. निर्मल दत्त ठाकूर, जनरल फिजिशियन यांच्या मार्फत मार्गदर्शन केले गेले. यावेळी मोठ्या संख्येने वृध्दांनी उपस्थिती दाखविली.
जास्त संख्येने उपस्थित राहिलेल्या वृध्दांचे मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांच्या सोबत यानिमित्ताने अधिकाधिक वेळ घालवता आला यामुळे त्यांचे अनुभव व या वयात आरोग्याशी निगडीत उद्भणाऱ्या समस्या जाणता आल्या. ज्येष्ठ नागरिकांना चांगले सुदृढ आयुष्य कसे देता येईल हेच ध्येय समोर ठेवून आम्ही विनामुल्य आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे एसआरव्ही ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे सीईओ समीर पवार यांनी सांगितले.