Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रिव्हॉल्वरने गोळी झाडून हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या


मुंबई - मुलुंड येथील हॉटेल व्यावसायिकाने स्वत:कडील रिव्हॉल्वरने गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. सतनाम सिंग प्यारासिंग बोपाराई (५४) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची मुलुंड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

बोपाराई हे भांडुपमधील शेरा हॉटेलचे मालक असून ते बोपाराईज मार्शल सिक्युरिटीचे व्यवस्थापकीय संचालकदेखील होते. मुलुंडच्या वसंत गार्डन येथील विलोज टॉवरच्या १५ व्या माळ्यावर ते कुटुंबीयांसह राहत होते. मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या आर्थिक नुकसानीमुळे बोपाराई मानसिक तणावात होते. या नैराश्यातूनच त्यांनी रविवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये स्वत:च्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकून घरच्यांनी बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. त्या वेळी रक्ताच्या थारोळ्यात बोपाराई पडलेले आढळून आले. कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ फोर्टीज रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुलुंड पोलिसांनी घटनास्थळावरून त्यांचे रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपाराई यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यातूनच त्यांचा लिव्हरदेखील खराब झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom