मालगाडीचा वेग वाढणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

20 August 2018

मालगाडीचा वेग वाढणार


मुंबई : पश्चिम डेडिकेटड फ्रेट कॉरिडॉरमधील (डीएफसी) प्रकल्पांतर्गत हरयाणातील अटेली ते राजस्थानमधील फुलेरादरम्यान १९० किमी मार्गावर घेण्यात आलेली मालगाडीची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. त्यामुळे १५०४ किमी मार्गावरील कॉरिडॉर पूर्ण करण्यामधील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वी झालेला आहे. त्याचप्रमाणे दादरी ते जेएनपीटीपर्यंत मालगाड्यांचा वेग १०० किमी प्रतितासापर्यंत नेण्याची योजना आहे. सध्या देशातील मालगाडीचा किमान वेग ३० ते ३५ किमी प्रतितासापर्यंत मर्यादित आहे. या कॉरिडॉवर सध्याच्या वेगाच्या दुपटीपेक्षाही जास्त वेगाने मालगाड्या चालवण्यात येणार असल्यामुळे मालवाहतुकीचा वेग वाढणार आहे.

मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गाचा प्रकल्प असलेल्या पश्चिम मार्गावरील डीएफसी प्रकल्पात राज्याचाही समावेश आहे. त्यातील जेएनपीटी ते वैतरणापर्यंतच्या ९ किमी भाग सोडल्यास १०० किमी मार्गावरील प्राथमिक बांधकाम संबंधित काम सुरू झाले आहे. त्यातील दिवा ते पनवेल भागातील कामाने आता वेग घेतलेला आहे. प्रस्तावानुसार सप्टेंबर २०२० पर्यंत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत पश्चिम डीएफसीमधील अटेली ते मेहसाणापर्यंतच्या ९४१ किमीचा पहिला टप्पा सुरू होणार असल्याचे समजते. ३० ऑक्टोबर २००६ मध्ये कंपनी कायद्यांतर्गत डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (डीएफसीसीआय)ची स्थापना करण्यात आली. २००७ ते १२ च्या पंचवार्षिक योजनेत त्याचा समावेश करण्यात आला. त्याअंतर्गत पश्चिम आणि पूर्व डीएफसीचे एकूण ३,३६० किमी अंतराचा मार्ग असून, त्यात मालवाहतुकीप्रमाणेच अन्य मार्गिकांचा समावेश आहे. पूर्व डीएफसीचा प्रकल्प लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानकुनी १,७६० किमी अंतराचे असून पश्चिम डीएफसी राज्यातील जेएनपीटी ते उत्तर प्रदेशातील दादरीपर्यंत १,५०४ किमी अंतराची मार्गिका आहे. त्या मार्गिकेवरून १०० किमी प्रतितास वेगाने मालगाडी धावू शकेल. डीएफसीमुळे प्रमुख्याने देशभरातील मालवाहतूक क्षमतेत वाढ होणार आहे. या कॉरिडॉरवरून जाणाऱ्या प्रत्येक मालगाडीची लांबी ७०० मीटरपर्यंत जाईल. तसेच मालवाहनाची क्षमता १३ हजार टन इतकी होणार आहे.

पश्चिम डीएफसी - पहिला टप्पा 
४३० किमी : जेएनपीटी ते बडोदा.
९४७ किमी : बडोदा ते रेवाडी.
१२७ किमी : दादरी ते रेवाडी

Post Top Ad

test