Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

4 महिन्यांच्या बाळाची महिलेच्या तावडीतून सुखरूप सुटका


मुंबई - मुंबईतील आेशिवरा व आंबोली पोलिसांनी कारवाई करून अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका केली. 17 ऑगस्ट 2018 रोजी पुणे रेल्वेस्थानकातून 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. या अपहरण प्रकरणाचा छडा लावून पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पथकासमक्ष बाळाला ओशिवरा पोलिसांनी मातेच्या ताब्यात दिले. 

22 ऑगस्ट 2018 रोजी बकरी ईदनिमित्त मुंबईत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बंदोबस्तादरम्यान सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आंबोली पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक (बक्कल नं. 604) दुधाड, हवालदार (बक्कल नं. 12988) पवार, महिला पोलीस हवालदार (बक्कल नं. 483) गावनग हे पथक पोलीस मोबाईल व्हॅन क्र. 5 मधून गस्त घालत होते. त्यावेळी त्यांच्याकडे वर्षा पवार (20) ही महिला आली. तिने सांगितले की, एका महिलेने पुणे रेल्वेस्थानकातून 4 महिन्यांचे बाळ पळवले आहे. सदर माहिती मिळताच मोबाईल व्हॅनमधील पोलीस पथकाने तात्काळ बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल येथे धाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. मात्र सदर महिला व तिची साथीदार महिला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने दोन्ही महिलांना 4 महिन्यांच्या बाळासह आंबोली पोलिसांनी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील व पोलीस उपनिरीक्षक मोटे यांनी महिलेची कसून चौकशी केली असता तिने स्वत:चे नाव मनीषा महेश काळे (25, रा. पुणे रेल्वे स्थानकाजऴील, झोपडपट्टी) असे सांगितले. 17 ऑगस्ट 2018 रोजी एका महिलेची नजर चुकवून तिच्या 4 महिन्यांच्या बाळाला पळवल्याची कबुली मनीषाने दिली. त्यानुसार पोउनि पाटील व पोउनि मोटे यांनी तात्काळ पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता 4 महिन्यांच्या बाळीचे अपहरणाचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात (गु. र. क्र. 888/18) भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. 

माहिती मिळातच पुणे लोहमार्ग पोलीस महिलेला घेऊन ताबडतोब पुण्याहून मुंबईला येण्यास निघाले. कागदोपत्री पूर्तता करून सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार, पोलीस निरीक्षक कुरिल यांच्या मार्गदर्शनाखाली 4 महिन्यांच्या बाळाला मातेच्या ताब्यात देण्यात आले, तर मनीषा काळे हिला पुणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.  

त्या बाळाची माता येऊपर्यंत ओशिवरा पोलिसांनी बाळाची काळजी घेतली. त्याला आंघोळ घालणे, दूध पाजणे हा अनोखा क्षण कर्तव्यापोटी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक शर्मिला पाटील, महिला हवालदार संकटी, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. 081768) साळकर, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं. 070707) वावळे आदी महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या वाट्याला आला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom