औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 August 2018

औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्ह


मुंबई - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी ) पर्यटन मंत्रालयाच्या सहयोगाने औरंगाबाद येथे २४ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील बुद्धवारसा असलेल्या विविध ठिकाणांविषयी पर्यटकांना माहिती देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धविषयक पर्यटन नकाशावर अजिंठा आणि वेरूळ या ठिकाणांना महत्त्व प्राप्त करून देणे ही यामागील संकल्पना असल्याचे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले.

जगभरातील बुद्धवादी राष्ट्रांशी संबंध दृढ करून राज्यात बुद्ध पर्यटनाच्या नव्या संधी तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील आहे. औरंगाबादनजीक असलेल्या अजिंठा या युनेस्को वारसा स्थळाजवळ बुद्धिस्ट थीम पार्क आणि मठ बांधण्यासाठी बुद्धवादी देशांना जमीन उपलब्ध करून देण्याची एमटीडीसीची योजना आहे. राज्यात बुद्ध पर्यटनाला चालना देण्यासाठी के. जे. सोमय्या बुद्ध अभ्यास केंद्राशी हातमिळवणी करून नवी पर्यटन पॅकेजेस सुरू करण्याची योजना एमटीडीसीच्या विचाराधीन आहे. पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे त्यांच्या आयकॉनिक डेस्टिनेशन प्रोजेक्ट अंतर्गत युनेस्को वारसा स्थळे असलेल्या अजिंठा आणि वेरूळची निवड करण्यात आली आहे. विमानतळापासून ते या प्रेक्षणीय लेण्यांपर्यंतचा रस्ता विकसित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयातर्फे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी हातमिळवणी करण्यात आली आहे, जेणेकरून देशातील इतर भागांतून या ठिकाणी आलेल्या पर्यटकांना येथे पोहोचणे सुलभ होऊ शकेल. राज्यातील ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी प्रवचने दिली, शिकवण दिली आणि साक्षात्कार किंवा निर्वाण प्राप्त झाले त्या ठिकाणांना अधोरेखित करणे हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. राज्यातील बौद्ध वास्तू व केंद्रे यांच्या माध्यमातून हा समृद्ध वारसा अनुभवण्यासाठी बुद्धिस्ट देशांतील पर्यटकांना प्रोत्साहन देणे व यातून जगभरातील बुद्ध पर्यटनाच्या क्षमता विस्तारणे हा आमचा हेतू असल्याचे सुहास दिवसे यांनी सांगितले.

Post Top Ad

test