चालत्या लोकलमध्ये लेडीज स्टंटबाजी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 September 2018

चालत्या लोकलमध्ये लेडीज स्टंटबाजी


मुंबई - आतापर्यंत ट्रेनमध्ये आजवर आपण अनेक टवाळखोर तरुणांना चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करताना पाहिले आहे. त्यापैकी काहींवर रेल्वे पोलिसांनी कारवाईदेखील केल्या आहेत. मात्र आता 'हम किसीसे कम नही' असे समजणाऱ्या एका तरुणीने चक्क चालत्या लोकलमध्ये स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत रेल्वे पोलिसांनी या स्टंटबाज तरुणीचा शोध सुरू केला आहे.

३० ऑगस्ट २०१८ रोजी रात्रीच्या वेळी ही स्टंटबाज तरुणी हार्बर मार्गावरील रे रोड स्टेशनहून प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करताना या व्हिडिओत दिसते. संपूर्ण डबा रिकामा असताना ही तरुणी चक्क चालत्या लोकलच्या डब्यात दारात उभी राहून स्टंट करताना दिसत आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे एका तरुणीचा चालत्या लोकलमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेला धडा शिकवण्यासाठी तसेच दुसऱ्या कोणत्याही तरुणीने अशा प्रकारचे स्टंट करू नयेत, यासाठी पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असून, त्यासाठी पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेणार असल्याचे समजते. वर्षभरात हजारो प्रवाशांचा विविध कारणाने रेल्वे अपघातात मृत्यू होतो. त्यावर अंकुश लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणा तसेच फलकांद्वारे जनजागृतीचे प्रयत्न केले जातात, मात्र काही टवाळखोर मंडळी रेल्वे पोलिसांना न जुमानता अशा प्रकारे मृत्यूला आमंत्रण देताना दिसतात. 

Post Top Ad

test