
मुंबई - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे कामाचा आराखडा सर्व नेत्यांच्या सहमतीने मंजूर केला आहे. तरी इंदूमिल मधील डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या उंचीवरून वाद निर्माण केला जात आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कर्तृत्वाची उंची पुतळ्याच्या उंचीवरून कृपया मोजू नका. असे आवाहन करून डॉ आंबेडकरांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वेळ पडली तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सणारकासाठी राज्य सरकार गहाण ठेऊ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रिपाईच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान ही भारताची ओळख झाले आहे. संविधान आम्हाला गीता बायबल कुराण पेक्षा प्यारे आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रात रामदास आठवले यांना कॅबिनेट दर्जा चे मंत्रिपद तसेच राज्यात रिपब्लिकन पक्षाला एक राज्यमंत्रीपद देणार आणि महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्ष राजा सरवदे यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याची अधिसूचना तीन दिवसात काढण्यात येईल तसेच भीमकोरेगाव प्रकरणी झालेल्या महाराष्ट्र्र बंद मधील आंदोलकांवरील सर्व गुन्हे रद्द होतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रिपब्लिकन पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात उदघाटक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सभा अध्यक्ष म्हणून केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आंबेडकरी जनतेने ठाण्याच्या हायलँड पार्क मैदानात प्रचंड गर्दी केली होती. यावेळी खासदार कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, सीमाताई आठवले, कुमार जित आठवले, अविनाश महातेकर, भुपेश थुलकर, राजा सरवदे, बाबुराव कदम, एम डी शेवाळे, पुण्याचे उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे, ऍड आशाताई लांडगे, दिपकभाऊ निकाळजे, गौतम सोनवणे, डॉ विजय मोरे, सुरेश बरशिंग, अनिल गांगुर्डे, शीलाताई गांगुर्डे, दयाळ बहादूरे, पप्पू कागदे, कांतिकुमार जैन, अनिल गोंडाने, स्वागताध्यक्ष राम तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.