कामगार रुग्णालय आग प्रकरणी दोन जणांना अटक

JPN NEWS

मुंबई | अंधेरी मरोळ परिसरातील कामगार रुग्णालयाला सोमवारी(१७ डिसेंबरला) लागलेल्या भीषण आगीत १८६ जण जखमी झाले असून दहा जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत जखमी झालेले किसन नरावडे यांचा आज गुरुवारी (२० डिसेंबर) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आगी प्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

कामगार रुग्णालय आग प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सुप्रमी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना गुरुवारी (२० डिसेंबर) अटक केली. या दोघांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीचा अभियंता नीलेश मेहता आणि सहायक अभियंता नितीन कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच रुग्णांना इमारतीमध्ये प्रवेश का दिला, याबाबत दोघांकडे चौकशी केली जात आहे. या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !