महापालिकेच्या १४ प्रसुतिगृहांमध्ये १८५ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय

JPN NEWS

मुंबई - डॉक्टरांना होणारी मारहाण, मुलांची अदलाबदल किंवा चोरीच्या घटना टाळता याव्यात म्हणून महापालिकेच्या १४ प्रसुतिगृहांमध्ये १८५ सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुंबईला समाजविघातक शक्तींकडून धोका आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही डॉक्टरांना मारहाणींचे प्रकार घडत असतात. प्रसूतीगृहांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची वाढती संख्या विचारात घेता मुंबई पालिकेच्या अख्यारित प्रसूतीगृहांमध्ये लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर महापालिकेने १४ प्रसूतिगृहांमध्ये एकूण १८५ कॅमेऱ्यांची सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेरे खरेदीसाठी दोन कोटी ५८ लाख ९६ हजार ४२० रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १३५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. ७८ डोम कॅमेरे, ४६ बुलेट कॅमेरे आणि ११ पी.टी. झेड कॅमेरे असणार आहेत. यासाठी १ कोटी ८२ लाख ६२ हजार ५५८ रुपये खर्च केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.

प्रसुतिगृहातील कॅमेरे बंद किंवा नादूरुस्त झाल्याच्या तक्रारी आल्यास त्यांचे निवारण आठ तासांत करणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. मुदतीच्या वेळेत दुरुस्ती न केल्यास संबंधिताला प्रथमतः ५०० रुपये दंड आकारला जाईल. मात्र, त्यानंतरही कंत्राटदारांने दुर्लक्ष केल्यास त्याला २००० हजार रुपये दंड आकरण्यात येणार आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !