डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी मुंबईत स्थापन करण्यास मान्यता

JPN NEWS

मुंबई - उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच मुंबई विद्यापीठावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने मुंबईतील चार महाविद्यालयांना एकत्रित करून डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीभिमुख अभ्यासक्रम राबविणे आता अधिक सुलभ होणार आहे.

सध्या मोठ्या संख्येने संलग्नित असलेल्या महाविद्यालयांमुळे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासह आवश्यक त्या भौतिक सुविधांची तपासणी करणे विद्यापीठांना कठीण जात आहे. अशा परिस्थितीत विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील 3 ते 5 महाविद्यालये एकत्र केल्याने विविध विद्याशाखांचा संगम होऊन समूह विद्यापीठाची स्थापना केल्यास उपलब्ध मानव संसाधन व अन्य साधन सुविधांचा अधिकाधिक वापर होऊ शकणार आहे. तसेच वेगाने बदलत जाणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रवाहात रोजगार निर्मितीभिमुख अभ्यासक्रम राबविणे समूह विद्यापीठांना शक्य होणार आहे. मुंबईत असे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रूसा 2.0 अंतर्गत शासनाच्या या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. यानुसार मुंबईतील शासकीय विज्ञान संस्था (इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) या मुख्य विद्यालयासह सिडनहॅम कॉलेज, एलफिन्स्टन कॉलेज व शासकीय अध्यापक महाविद्यालय (बीएड कॉलेज) यांचा समावेश असलेली डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या युनिव्हर्सिटीसाठी आवश्यक पदनिर्मितीसह आवर्ती व अनावर्ती खर्चासही मान्यता देण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !