बेस्ट बसच्या धडकेत दोन दुचाकीस्वार जखमी

Anonymous

मुंबई - सांताक्रूझ कालिना येथे दुमजली बेस्ट बस ला झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जखमी झाले. बेस्ट बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे चालकाचा बेस्ट बसवरील ताबा सुटला व बेस्ट बस भिंतीवर जाऊन धडकली त्याचवेळेस दुचाकीस्वार जाऊन बेस्ट बस वर जाऊन आदळले व जखमी झाले.
 
आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी कुर्ला आगाराची दुमजली बस [ ४९४५ ] बस मार्ग क्रमांक ३१३ वर सांताक्रूझ बस स्थानक [ पूर्व ] येथून कुर्ला स्थानक येथे [ पश्चिम ] येथे जात होती. सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी बस कालिना मिलिट्री कॅम्प येथे आली असता बसच्या पुढील उजव्या बाजूची शॅकल पीन बाहेर आली व बसचे पुढील चाक वाकडे झाले व बस एका दिशेला खेचली गेली. मोठा आवाज झाल्याने बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटले व बस चालकाने जोरात ब्रेक दाबले. मात्र बस एका जागी उभी ना राहता उजव्या बाजूला असलेल्या भिंतीला व झाडाला जाऊन धडकली. त्याचवेळेस विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराची दुचाकी नियंत्रित झाली नाही व त्यावरील दोघेही दुचाकीस्वार बेस्ट बस वर जाऊन धडकले. त्या स्कुटीवरील दोघेही जखमी झाले त्यांना त्वरित नजीकच्या व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात जॉन सिक्वेरा [ वय ५८ ] यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला व मणिलाल पानवेली वय २६ ] यांचा डावा पाय व डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. दोघांचीही प्रकृती आता स्थिर आहे  
Tags