Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

अपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी


नवी दिल्ली -देशात अपघातप्रवण स्थळांच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी खर्च करणार आहोत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. निस्सान इंडियाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आमच्या खात्यातर्फे रस्ते अपघातात बळींची संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. 

दरवर्षी भारतात रस्ते अपघातात एक लाख जणांचा बळी जातो.अनेकदा रस्ते अपघात हे अभियांत्रिकीचे नियम न पाळल्याने होतात. आम्ही अपघातप्रवण भाग शोधून काढले आहेत. त्याच्या उपाययोजनांसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

रस्ते सुरक्षा हा सार्वजनिक जनजागृतीचा भाग आहे. तसेच वाहन लायसन्स देताना अत्यंत गंभीरपणे पाहायला पाहायला हवे. तसेच राज्य सरकारने रस्ते सुरक्षा हा विषय शाळेत शिकवायला हवा. सरकारने वाहन उद्योगाला याबाबत उपाययोजना करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

निस्सान इंडियाचे अध्यक्ष थॉमस क्युएल यांनी सांगितले की, भारतातील रस्ते व वाहतूक खात्याच्या अहवालानुसार, 2017 मध्ये रस्ते अपघातात 9408 लहान मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला. आता रस्ते सुरक्षेसाठी विविध मोहीमा हाती घेतल्या जात आहेत. सीटबेल्ट लावण्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होते. विशेष करून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी लक्ष पुरवले जाणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom