इडली- डोशातून महापालिका कामगारांना विषबाधा


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बी वॉर्डमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज (३१ जानेवारी) विषबाधा झाली आहे. या रूग्णांना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले असून एकूण १० जणांना विषबाधा झाल्याची माहिती मिळत आहे. 

जे. जे. रुग्णालयासमोरील बी प्रभाग कार्यालयात दुपारी तीनच्या सुमारास पालिकेचे नऊ कामगार व एक कॅन्टीनमधील कर्मचारी अशा दहा जणांनी इडली- डोसा खाल्ला. त्यानंतर काही वेळातच उलट्या, मळमळ, चेहऱ्यावर सूज आल्याने एकच खबराट पसरली. या सर्वांचीच प्रकृती खालावत गेल्याने तात्काळ जे. जे. रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. सहा पुरुष आणि चार महिलांचा यात समावेश आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर पालिकेच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.या घटनेच्या चौकशीचे आदेश प्रशासनाने दिले असून संबंधित कॅन्टीनमधील अन्न पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आहेत. दरम्यान, संबंधित कॅन्टीन बंद करण्यातआल्याची माहिती पालिका सहाय्यक आयुक्त विवेक राही यांनी दिली.

विषबाधा झालेल्यांची नावे
१) निशात सुर्यवंशी (२७)
२) कृष्णकांत धनावडे (४९)
३) चंद्रशेखर पाटील (२५)
४) तनय जोशी (५६),
५) चंद्रकांत जांभळे (४६)
६) तृप्ती शिर्के (३५)
७) प्रतिक्षा मोहिते (२१)
८) सविता पंडीत (३५)
९) सुषमा लोखंडे (४७)
१०) नरसिंम्हा कांचन (६५)
Tags