‘ठाकरे’ - शिवसैनिकांसाठी मोफत थिएटर बुक करण्याचे आदेश


मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट शिवसैनिकांना मोफत दाखविला जाणार आहे. त्यासाठी मुंबईतील आपआपल्या विभागातील थिएटर बुक करा, असा आदेश देण्यात आल्याची माहिती कळते. हा चित्रपट चार दिवसांनी प्रदर्शित होणार असल्याने शिवसैनिकांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता ताणली गेली आहे. हा चित्रपट शिवसैनिकांना मोफत दाखवा. त्यासाठी आपल्या जवळचे चित्रपटगृह बुक करा, असा आदेश शिवसेनेकडून देण्यात आल्याने प्रत्येक विभागातील शिवसेनेचे आमदार व नगरसेवक त्या दिवशी संपूर्ण चित्रपटगृहाच्या तिकीट स्वखर्चाने खरेदी करून थिएटर बुक करण्याच्या तयारीला लागले आहेत.