संपात सहभागी झालेल्या बेस्ट कर्मचार्‍याला पक्षाघाताचा झटका

मुंबई - बेस्टचा संप सुरु आहे. या संपात सहभागी झालेल्या देवनार बस डेपो मधील वाहक रवींद्र वाघमारे (42) यांना शुक्रवारी मेंदूचा पक्षाघात झाला. त्यांच्या शरीराची डावी बाजू निकामी झाली आहे. त्यांच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रवींद्र खारघर येथे राहत असून शुक्रवारी सकाळी साडेतीन वाजता घरातून कामासाठी बाहेर पडले. सकाळी आठच्या सुमारास अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने अकराच्या सुमारास शीव रुग्णालयात नेले. रवींद्र वाघमारे यांना मेंदूचा पक्षाघात झाल्याने अर्धागवायूचा झटका आला. यात त्यांच्या डाव्या बाजूवर परिणाम झाला असून तिथल्या संवेदना गेल्या आहेत, अशी माहिती त्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. रवींद्र यांना दीड वर्षांची मुलगी असून आम्ही तिघे भाऊ एकत्र राहतो. अद्याप त्याच्या पत्नीला याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे आता घरी काय सांगावे, हेच समजत नाही, असे त्यांचे भाऊ प्रमोद वाघमारे यांनी सांगितले. 
Tags