
नागपूर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याच कार्यकाळात झालेल्या दंग्यात चंद्रशेखर आझाद या कार्यकर्त्याचा जन्म झाला आहे. त्यांनी आणखी दंगे घडवले तर आणखी चंद्रशेखर जन्म घेतील, असे वक्तव्य भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी अमरावती येथे बोलताना केले.
चंद्रशेखर आझाद यांचे अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर आगमन झाले. त्यांचे वाहन थेट सभामंचाच्या जवळ पोहोचले. यावेळी जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. आझाद म्हणाले, भीम आर्मीचे कार्यकर्ते संपूर्ण भारतभर आहेत, त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना काहीही होऊ देणार नाही. हा देश संविधानानुसार चालतो. तुम्ही संविधानानुसार चालणार नसाल तर तुमची खुर्ची आम्ही काढून घेऊ. पुण्यातील वढू बुद्रुक येथे वीर गोविंद महार यांची समाधी आहे. याचे चांगले स्मारक सरकारने बांधावे. त्यांनी हे काम नाही केले तर सर्व आंबेडकरवादी करतील, असा इशारा त्यांनी दिला.