Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपकडून ५ हजार किलोची खिचडी


नवी दिल्ली – पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपने दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात ‘भीम महासंगम विजय संकल्प २०१९’ रॅलिचे आयोजन केले आहे. आजपासून ते पुढील ३ आठवड्यापर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पाच हजार किलोची खिचडी तयार करणार असून कार्यकर्त्यांमध्ये वाटप केले जाणार आहे. ही खिचडी नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर बनवणार आहेत. या रॅलीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सहभागी होणार आहे. दिल्लीतील सर्व १४ जिल्ह्यांतील दलित घरांतून तांदुळ, डाळ, मीठ आणि खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य जमवले आहे. ही खिचडी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकांमध्ये वाटली जाणार आहे. शेफ मनोहर टीमसह २० फूट व्यासाचे आणि सहा फूट खोल पात्रामध्ये खिचडी बनवून विश्वविक्रम रचणार असल्यची माहिती मिळाली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom