रंगांधळ्या विद्यार्थ्यांबाबत नियमावली तयार करा


मुंबई – ग्रँट मेडिकल कॉलेजमधील परिचर्या अभ्यासक्रमाच्या दुसर्‍या वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रवेश रंगआंधळेपणामुळे रद्द करण्यात आला होता. याबाबत इंडियन नर्सिंग कौन्सिल आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन महासंचालनालयाने दोन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. 

राज्य सरकारने रंगांधळ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी नियमावली तयार करावी, तसेच त्यांना शिक्षणात अत्याधुनिक साधनांचा वापर कसा करता येईल याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेशही न्यायालयाने दिला.

रविकांत नाईक या विद्यार्थ्याने परिचर्या अभ्यासक्रमासाठी भायखळा- जे. जे समूह रुग्णालयाच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. बी.एस्सी. (नर्सिंग)च्या दुसर्‍या वर्षात गेल्यानंतर त्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले, त्या वेळी रुग्णालयात झालेल्या चाचणीत तो रंगांधळा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी तो अपात्र असल्याचे स्पष्ट झाले; तरीही त्याला दुसरे वर्ष पूर्ण करण्याची मुभा
दिली होती.
Tags