
आदर्श मिश्रा हे एका इंग्रजी दैनिकात पत्रकार म्हणून काम करत होते. त्यानंतर ते एका इंग्रजी नियतकालिकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मॉर्निंग वॉकसाठी ते दररोज राहत असलेल्या इमारतीच्या ७ व्या मजल्यावरील गच्चीवर जात असत. नेहमीप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास त्यांचा ७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ही आत्महत्या होती की अपघात हे अद्याप समजू शकलेले नाही.मृ तदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.