पिंपरीत मेट्रोची क्रेन कोसळली - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 January 2019

पिंपरीत मेट्रोची क्रेन कोसळली


पिंपरी – महामेट्रोचे काम सुरू असताना नाशिक फाटा येथे अवाढव्य क्रेन कोसळली. क्रेनमार्फत काम सुरू असताना फार वाहतूक वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ‘महामेट्रो’कडून पुणे मेट्रोचे दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले आहे. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असा आहे. 

त्यापैकी पिंपरी ते दापोडी हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोचे पिलर, वाय डक्ट, रनवेचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. प्रमुख चौकांमध्ये मेट्रोचे पिलर उभे करण्यासाठी जमिनीखाली खडक किती अंतरावर आहे, त्याचा पोत कसा आहे हे पाहण्यासाठी या अवाढव्य क्रेनच्या माध्यमातून खड्डे करण्यात येतात. त्यानंतर तेथे पिलर उभे केले जाताते. अशाच पद्धतीने नाशिक फाटा येथे काम सुरू असताना ही अवाढव्य क्रेन आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली. ही क्रेन हटवण्याचे काम मेट्रोकडून सुरू करण्यात आले आहे.

Post Bottom Ad