भाजपा नगरसेविकेच्या अरेरावीविरोधात परिचारिकांचे आंदोलन

Anonymous

मुंबई - भाजपाच्या नगरसेविकेने आणि त्यांच्या दिराने शिवीगाळ तसेच अरेरावी केल्याचा आरोप करत नायर रुग्णालयामधील ७०० परिचारिकांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. नगरसेविकेने माफी मागावी अशी मागणी परिचारिकांनी आहे. जो पर्यंत नगरसेविका माफी मागणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार असल्याचा इशारा नायर रुग्णालयाच्या परिचारिकांनी दिला आहे. मात्र नगरसेविकेने माफी मागण्यास नकार दिला.  

भाजपाच्या नगरसेविका सुरेखा लोखंडे यांनी आपल्या भाच्याला शुक्रवारी नायर रुग्णालयात ताप आल्या कारणाने दाखल केले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना आपल्या रुग्णाला ताप आला असल्याची कल्पना देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी डॉक्टरने त्यांच्याशी उर्मट वर्तन केले. तसेच औषधे देण्यास आलेल्या परिचारिकांनी देखील रुगणाच्या नातेवाईकांना पुरेशी औषधे आणून ठेवा. जर नसतील तर आम्ही देणार नाही असा दम देखील भरला. त्यानंतर सुरेखा यांचे दीर शनिवारी रुग्णाला पाहण्यास गेले असता त्यावेळी देखील डॉक्टर आणि परिचारीकांनी त्यांच्यासोबत देखील गैरवर्तन केले. त्याबाबत सुरेखा स्वतः विचारपूस करण्यास गेल्या असता, त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत सोमवारी अधिष्ठाता कार्यालय संबंधित परिचारिका आणि डॉक्टर यांच्या वर्तनाबाबत चर्चा सुरू असताना त्यांनी युनियनला हाताशी धरून आंदोलन केले. जर नगरसेविकेच्या रुग्णाला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांना काय सेवा मिळत असेल असा प्रश्न सुरेखा लोखंडे यांनी उपस्थित केला आहे. 
Tags