सरगम सोसायटी आणि अग्निशमन दलाच्या लिपिकावर कारवाई

JPN NEWS

मुंबई - चेंबूर येथील टिळकनगरमध्ये लागलेल्या आगीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सरगम सोसायटी आणि अग्निशमन दलाच्या लिपिकावर कारवाई करण्यात येणार आहे. टिळकनगर येथील सरगम या सोसायटीमध्ये 27 डिसेंबर भीषण आग लागून 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दोघेजण जखमी झाले. मुंबईत वाढत्या आगीच्या घटनांमुळे सभागृहात पडसाद उमटले. पालिका अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने यावेळी स्पष्टीकरण देताना, सरगम सोसायटीने महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 च्या कलम 3 नुसार

अग्निसुरक्षेसंबंधित यंत्रणेचे उल्लंघन केले होते. त्यामुळे आता महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम 2006 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तर सोसायटीने जानेवारी 2018 मध्ये, इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा तपासण्याबाबत अग्निशमन दलाच्या वडाळा केंद्रात केलेल्या अर्जाबाबत तेथील लिपिकाने योग्य ती कार्यवाही करून संबंधित अधिकार्‍यांकडे वेळीच न पाठवल्याने त्या अधिकार्‍यावरही कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे अग्निशमन दलाने म्हटले आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !