लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर


मुंबई - मुंबईकरांची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) खरोखरच एका रुग्णासाठी जीवनवाहीनी ठरली आहे. दुपारी लोकल ट्रेनच्या माध्यमातून माणवी शरीराचे महत्वाच अंग असलेले यकृत (लिव्हर) मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात पोहचविण्यात आले. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर करण्याची ही पहिलीच घटना आहे.

ठाण्यातील एका ५३ वर्षाच्या व्यक्तीचा अपघात झाला त्यांना या अपघातात जबर मार बसला. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. मात्र या व्यक्तिने आधीच अवयवदानाची नोंदणी करुन ठेवली होती. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या व्यक्तिचे यकृत परळच्या ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. यासाठी लोकल ट्रेनची मदत घेण्यात आली. त्यासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयापासून ते ठाणे स्थानकापर्यंत ग्रीन कॉरीडॉर बणविण्यात आला होता. तेथून पुढे ठाणे ते दादर स्थानकापर्यंत हे यकृत लोकल ट्रेनमधून आणण्यात आले. यासाठी ठाण्यावरुन दुपारी ३.०४ वाजताची फास्ट लोकल ट्रेन पकडून ती ट्रेन ३.३५ वाजता दादरला पोहचली. यासाठी रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली. पुढे दादर स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ते यकृत त्वरीत ग्लोबल रुग्णालयात पोहचवण्यात आले.
Tags