#Budget2019 - अंतरिम बजेट


 • हा अर्थसंकल्प म्हणजे देशाची विकासयात्रा, असे म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला अंतरिम अर्थसंकल्प
 • दरमहा ५००० रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागू होणार नाही
 • शैक्षणिक कर्जावर, घरांवर त्याचप्रमाणे बाकी कर्जांवर कोणताही कर लागू होणार नाही
 • सामाजिक आणि अन्य क्षेत्रात प्रगती. बांधकाम, आरोग्य, रस्ते विभागात प्रगती
 • वैद्यानिक दृष्टीने संस्थांची निर्मिती आणि प्रगती
 • डिजिटल इंडियामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती. २०३०मध्ये भारत म्हणजे प्रत्येक क्षेत्रात प्रगती.
 • आपला भारत हा विद्युत वाहनावर काम करेल.
 • भरपूर रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न
 • नद्यांची स्वच्छता हे आमचे मूळ ध्येय असणार
 • भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम
 • निरोगी आणि रोगमुक्त भारत
 • २०३० पर्यंत चिंतामुक्त भारत
 • भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम रत बनवायचा आहे
 • महिलांना समान अधिकार, सुरक्षा देणार
 • आयकर सूट मर्यादा अडीच लाखांवरुन ५ लाखांवर, सरकारचा अत्यंत मोठा निर्णय
 • देशातील सर्वसामान्य करदात्यांना अत्यंत मोठा दिलासा
 • संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध
 • ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरुन २० लाखांवर
 • जीएसटी परिषद घेणार नव्या घरांचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय
 • आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
 • जीएसटीमध्ये कोणतेही बदल नाहीत
 • लघुद्योगांसाठी ६ टक्के जीएसटी
 • केंद्राकडून जीएसटीमधील १४ टक्के कर हा राज्यांना दिला जाणार
 • भ्रष्टाचारविरोधी कारवायांमधून १,३०,००० कोटी कर वसुली
 • सध्या आयकर विभाग ऑनलाईन
 • पुढील २ वर्षात आयकरसंबंधी सर्व गोष्टी कॉम्पुटरवर होतील
 • मध्यमवर्गीयांचा आयकर कमी करणे हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य
 • सरकारने मागील काळातील ८० सी अंतर्गत योजना ४ वर्षात राबवल्या
 • लघुद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत
 • चित्रपटांसाठी फक्त १२ टक्के कर
 • घरांवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी विभागाकडे एका शिस्तमंडळातर्फे अहवाल देणार
 • भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
 • ५ वर्षात मोबाइल डेटाचा वापर ५० टक्क्याने वाढला
 • ५ विमान प्रवाश्य़ांची संख्या दुप्पटीने वाढली
 • येत्या ५ वर्षात १ लाख गावांना डिजिटल करण्यासाठी प्रयत्न
 • गावे देखील डिजिटली विकसित केली जातील
 • पायरसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील
 • मनोरंजन क्षेत्राविषयी बोलताना ‘उरी’चा उल्लेख
 • मनरेगासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद
 • जवानांकरिता ३५००० कोटींची तरतूद
 • सेमी वंदे भारत या हायस्पीड रेल्वेमुळे रेल्वेला गती मिळेल
 • रेल्वेसाठी ६४,५०० कोटींची तरतूद
 • दररोज देशात २७ किलोमीटरचे रस्ते बांधले जातात
 • संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद
 • ४० वर्षांपासून रखडलेली वन रँक वन पेन्शन योजना लागू
 • जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू
 • गर्भवती महिलांसाठी २६ आठवडे भरपगारी मात्तृत्व रजा
 • उज्ज्वला योजनेंतर्गत ६ कोटी
 • मुद्रा योजनेत १५ लाख कोटींचे कर्ज वाटप
 • असंघटीत कामगारांसाठी सरकारची श्रमयोगी योजना
 • १० कोटी असंघटीत कामगारांना होणार फायदा
 • किमान मासिक ३००० मासिक वेतन मिळणार
 • २१००० पगार असलेल्या कामगारांना मिळणार बोनस
 • असंघटित कामगारांना ३००० मासिक बोनस
 • असंघटीत कामगारांसाठी महत्वाची घोषणा
 • मेघ पेन्शन योजना जाहीर
 • स्वतंत्र फिशरी विभाग स्थापन केले जाणार आहे
 • कामधेनू योजनेसाठी ७५० कोटी खर्च करणार सरकार
 • २१ हजार पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार बोनस मिळणार
 • १० कोटी असंघटीत कामगारांना य़ोजनेचा लाभ
 • गाईच्या प्रजाती सुधारण्यासाठी योजना
 • नोकरीदऱ्याम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखावरुन ६ लाख केली
 • पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड
 • पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी कर्जात २ % सूट
 • गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना
 • अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत
 • ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांची मदत
 • किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात, लवकरच शेतऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
 • एकूण २२ पिकांचा हमीभाव वाढ, हे यापूर्वी कधीही झाले नाही
 • शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’
 • अंबलबजावणी २०१८ डिसेंबरपासून, पहिला २००० चा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार
 • २ एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला ६००० रुपये जमा होणार
 • २०२१ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचा संकल्प
 • मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यांच्या विकासावर भर देणार
 • देशात एकूण २१ एम्स कार्यरत, हरियाणात २२वे एम्स बांधणार.
 • आयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे ३ हजार कोटी रुपये वाचले
 • प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे १ लाख ५३ हजार घरे बनविण्यात आली
 • स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
 • मनरेगासाठी मोठे अर्थसाहाय्य
 • आम्ही लोकांच्या विश्वासास खरे उतरले
 • जीएसटीमुळे देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ बनले
 • पूर्वीच्या तुलनेत राज्यांना १० % अधिक निधी मिळण्यास सुरुवात
 • सकारात्मक योजनांमुळे मोठी परकीय गुंतवणूक
 • सरकारचा तोटा ६ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर
 • २०२० पर्यंत सर्वांना स्वतःचे घर तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार
 • भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर
 • महागाईवर नियंत्रण मिळवण्यास केंद्र सरकारला मोठे यश
Tags