केंद्र सरकारच्या धर्तीवर दुर्बल घटकातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळावी

JPN NEWS

मुंबई -- आर्थिकदृष्ट्या दुबॅल घटकातील गर्भवती महिलांनी मुंबई महापालिका रुग्णालयात नाव नोंदवल्यानंतर त्यांना प्रसूती होईपर्यंत प्रत्येक महिन्यास दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली आहे.

मुंबईकरांचे जीवन हे हलाखीचे व धावपळीचे झाले आहे. त्यात महागाई आग ओकत असल्याने घरातील कमवत्या पुरुषाबरोबर महिलाही संसाराची गाडी रेटत आहेत. मात्र महिला गर्भवती असल्यास तिच्या धावपळीचा परिणाम जन्माला येणा-या बाळावर होतो. त्यामुळे मुंबईच्या या धकाधकीच्या जीवनात जन्माला येणा-या बाळाला योग्य आहार मिळावा व कुपोषित बालकांवर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पालिकेने आर्थिक सहाय्य करावे, असे नगरसेविका मुमताज खान यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे.

मुंबईसह देशात कुपोषित व रक्ताचा अभाव असलेल्या स्त्रियांची संख्या वाढते आहे. कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकारच्या मातृवंदना योजनेच्या धर्तीवर पालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गर्भवती महिलांना प्रसूतीहोईपर्यंत प्रती महिना २ हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतची ठरावाची सूचना येत्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !