
आज लोकसभा मतदारसंघनिहाय नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पहिल्या टप्प्यातील 8- वर्धा लोकसभा मतदारसंघात 5 (6), 9- रामटेक मतदारसंघ 2 (2), 10- नागपूर मतदारसंघ 9 (12), 11- भंडारा- गोंदिया मतदारसंघ 4 (6), 12- गडचिरोली- चिमूर मतदारसंघ 4 (4), 13- चंद्रपूर मतदारसंघात 1 (2) आणि 14- यवतमाळ- वाशिम मतदारसंघात 7 (11) उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या आणि कंसात आजपर्यंत नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 5- बुलढाणा मतदार संघ 1 (1), 6- अकोला 1 (2), 7- अमरावती 1 (5), 15- हिंगोली 2 (2), 16- नांदेड 7 (11), 17- परभणी 1(3), 39- बीड 1 (1), 40- उस्मानाबाद मतदारसंघात आज रोजी तसेच आजपर्यंत 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 42- सोलापूर मतदारसंघात आज नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसले तरी आजपर्यंत एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.