सिद्धार्थ कॉलेजचे 80 टक्के विद्यार्थी नापास - विद्यापीठाकडे तक्रार

Anonymous

मुंबई – गेल्या आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या सेंकड ईयर एलएलबीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये एलएलबीच्या तिसर्‍या सेमिस्टरमध्ये ‘सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ’ चे चक्क 80 टक्के विद्यार्थी नापास झाल्याचे आढळून आले. 240 पैकी 190 विद्यार्थी तिसर्‍या सेमिस्टरमध्ये नापास झाले आहेत.

या नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या तक्रार निवारण विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. हे विद्यार्थी एक ते तीन विषयांत नापास झालेले आहेत. काहींना तर चार विषयांत 35 पेक्षा कमी गुण मिळाले आहेत. एलएलबी परिक्षेच्या विषयात उर्त्तीण होण्यासाठी 100 पैकी किमान 45 गुण मिळावे लागतात. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, पेपर तपासणीसांनी परिक्षा पेपर योग्य
तपासले नाहीत.
Tags