पालिका निवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

मुंबई  - मुंबई महापालितेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे निवृत्त वेतनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महापालिकेने मंगळवारी (१२ मार्च) उच्चस्तरीय पेन्शन अदालतचे आयोजन केले आहे. भायखळा येथील "ई" विभाग कार्यालयातील तिसऱ्या मजल्यावर सकाळी ११ वाजता पेन्शन अदालत सुरु होणार आहे.

विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी निवृत्ती वेतनधारक महापालिकेतील सतत खेटे घालत असतात. याप्रकरणाचा न्यायनिवाडा करण्यासाठी पालिका आयुक्तांनी लेखापाल यांची निवड केली. दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी यानंतर उच्चस्तरीय पेन्शन अदालत सुरु झाली. या अदालत’मध्ये प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी अधिकारी व उप कायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली. पेन्शनधारकांची सर्व गाऱ्हाणी ऐकून त्यावर समितीने कार्यवाही केली जाते. सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख, अधिष्ठाता यांच्या स्तरावर ज्या प्रकरणांचे निराकरण झालेले नाही, अशाच प्रकरणांचा समावेश अदालतीमध्ये केला आहे. त्यामुळे विहित नमुन्यात अर्ज सादर केलेल्या निवृत्ती वेतनधारकांनी पेन्शन अदालतीमध्ये भाग घ्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.
Tags