अर्नाळा बीचवर होळी साजरा करण्यास गेलेल्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू


मुंबई २१ मार्च - नालासोपारा येथील अर्नाळा बीचवर समुदात ५ जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. वसई पश्चिम येथील अर्नाळा बीचवर काही जण समुद्रामध्ये होळी साजरी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यापैकी ५ जणांचा मुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला आहे. हे पाचही जण वसईतील गोकुळ पार्क येथील रहिवासी आहेत.

समुद्रात बुडालेल्या व्यक्तींची नावे - 1) निशा कमलेश मौर्या (36)
2) प्रशांत कमलेश मौर्य (17)
3) प्रिया कमलेश मौर्य (19)
4) कंचन मुकेश गुप्ता (35)
5) शितल दिनेश गुप्ता (32) 
Tags