विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर भाजपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 March 2019

विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळंबकर भाजपात


मुंबई - लोकसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय नेत्यांकडून पक्षबदल सुरु झाले आहेत. राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्या नंतर आता मुंबईमधील काँग्रेसचे आमदार व नारायण राणे यांचे समर्थक कालिदास कोळंबकर हे भाजपात प्रवेश करणार आहेत. सोमवारी कालिदास कोळंबकर यांनी वडाळा येथील जनसंपर्क कार्यालयावरील काँग्रेस नेत्यांचे फोटो काढून चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेला फलक लावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

सध्या कालिदास कोळंबकर काँग्रेसचे आमदार असून, जर त्यांनी आता काँग्रेसचा हात सोडला तर त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. तसेच विधानसभा अवघ्या काही महिन्यावर असताना आता राजीनामा देणे उचित नसल्याने तूर्तात तरी कालिदास कोळंबकर शरीराने का होईना काँग्रेसमध्ये राहणार आहेत. दरम्यान, कालिदास कोळंबकर यांनी सांगितले की, माझी आता काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा राहिली नसून, आघाडीच्या काळात मी ज्या पोलीस वसाहतीचा प्रश्न लावून धरला तो युतीच्या मुख्यमंत्र्यांने पूर्ण केला त्यामुळे जो पोलीस वसाहतीचा प्रश्न सोडवेल त्याच्यासोबत मी उद्या देखील जाईन असे देखील कालिदास कोळंबकर यांनी सांगितले. दरम्यान कालिदास कोळंबकर यांनी मला अनेक ठिकाणावरून ऑफर असल्याचे सांगत मला शिवसेनेकडून देखील विचारल्याचे सांगितले.

Post Bottom Ad