सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

Share This

मुंबई - डॉ. सुजय विखे पाटील आज (१२ मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार केला आहे. सुजय हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. अहमदनगरमधून सुजयला काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविणार आहे. प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची शासकीय निवास्थान 'शिवनेरी'वर येथे भेट घेतली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय भाजपात प्रवेश करणार याबाबतच्या चर्चा केल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. मात्र राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा मध्यंतरी सुरु झाली होती. मात्र सुजय राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात खासगीत बैठक झाल्या. मात्र पवारांनी अशा बैठका झाल्याच नसल्याचे जाहीर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका घेईल? याचा थांगपत्ता विखेंना लागत नाही. म्हणूनच सुजय यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages